General Discussion Thread

Music Fan

EntMnt Contributor
हा एक अफलातून किस्सा आहे, प्रत्यक्षात एका सिव्हिल इंजिनीअरने सांगितलेला...

एका जर्मन कंपनीचं कार्यालय बी.के.सी. मध्ये बांधलं जात होतं.

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स हा भाग समुद्रात भराव टाकून तयार केला आहे.

इमारतींचा पाया खोल घट्ट दगडापर्यंत खणला जावा म्हणून अनेक इमारतींचे दुमजले जमिनीच्या पोटात आहेत.

तर या जर्मन कंपनीच्या कार्यालयात बेसमेंटच्या भागात एक प्रचंड मोठं ३० टनांहूनही अधिक वजनाचं यंत्र बसवण्यात येत होतं.

बंदरात जहाजामधून उतरवून एका माथाडी कामगारांच्या टोळीने ट्रेलरवर चढवून ते बी.के.सी. मध्ये आणलं.

मात्र ते खाली उतरवून इमारतीच्या तळमजल्यात ३० फुट खाली उतरवायचं कसं हा मोठाच प्रश्न त्यांना पडला.

कारण जर्मनीहून आलेलं ते यंत्र प्रचंड महाग होतं. रिस्क घेणं शक्यच नव्हतं आणि त्यावेळी एवढं वजन उचलू शकणारी मोबाइल क्रेन मुंबईत नव्हती.

ऐन पावसाळ्यात हे सगळं होत असल्याने आसपास दलदलही खूप होती. विचार करण्यातच दोन दिवस गेले. शेवटी जमशेदपूरहून एक मोबाइल क्रेन मागवण्याचं ठरलं.

त्याला दोन आठवडे सहज लागणार होते. तोपर्यंत माथाडी कामगार थांबणं शक्य नव्हतं. त्यांचा काँट्रॅक्टर घाई करू लागला.

"मी मशीन कामगारांच्या साहाय्याने खाली उतरवतो, मला मोकळं करा" असं तो म्हणू लागला.

अखेरीस त्याला सांगण्यात आलं की हे मशीन खाली उतरवणं कठीण जातंय. त्यासाठी लांबून क्रेन मागवलीय. ती येईपर्यंत पंधरा दिवस तरी थांबावं लागेल.

त्यावर तो काँट्रॅक्टर म्हणाला, "साहेब, मला सांगितलं असतं तर मी झटक्यात मशीन खाली उतरवून दिलं असतं".

त्यावर कंपनीचा इंजिनीअर हसला. त्याला म्हणाला, "एवढं सोपं काम नाही ते, आम्ही सगळे इंजिनीअर दोन दिवस त्यावर डोकं घासतोय".

हे चॅलेंज घेत माथाडी कंत्राटदार म्हणाला, "मी अगदी अल्लद मशीन उतरवून दिलं तर मला काय द्याल..??"

तरीही भारतीय इंजिनीअर त्याची खिल्ली उडवत राहिला. मात्र त्यांच्या जर्मन साहेबाने ते ऐकलं आणि त्याची काय युक्ती आहे ते ऐकून तर घेऊया, असं तो म्हणाला..

माथाडी त्यांना म्हणाला, "मला आइस फॅक्टरीतून हा खड्डा भरेल एवढ्या बर्फाच्या लाद्या आणून द्या आणि एक चांगला पंप लावा इथे".

त्या खड्ड्यात त्याच्या सांगण्याप्रमाणे बर्फ आणून भरला गेला आणि मग त्यांनी ते यंत्र त्या बर्फावर उभं केलं आणि जस जसा बर्फ वितळत गेला तस तसं ते पाणी खड्ड्यातून पंपाद्वारे बाहेर टाकत गेले.

ते मशीन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खरंच अल्लद खाली उतरत गेलं. भारतीय तांत्रिक जुगाडाला जर्मन तंत्रज्ञानाने केलेला तो सलाम होता...

Its very good message
 
Sanjeev

Core Member

No one understands marathi here so better post it in English you have done that in the past too
 
Top